चांगल्या ठिकाणासाठी कर्मचाऱ्यांची जोरदार फिल्डिंग...
औरंगाबाद शहर पोलीस दलात सध्या कर्मचाऱ्यांचे बदलीचे वारे वाहत असून या साठी अर्ज मागविण्यात आले आहे.आपल्या पसंतीचे ठिकाणी मिळावे यासाठी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी फिल्डिंग लावल्या आहेत.येत्या आठवड्यात या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहर पोलीस दलात पोलीस शिपाई ते साह्ययक फौजदार पर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्याचे वारे सध्या वाहत आहे. ज्या कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा झालेली आहे. असे कर्मचारी व ज्यांना विनंती वरून बदल्या हव्या आहेत अशा पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्ज आयुक्त कार्यालयाच्या वतीने अगोदरच मागविण्यात आले आहे.पोलिसांच्या दरवर्षी होणाऱ्या बदल्या कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन या मुळे रखडल्या होत्या,मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने आता बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. या बदलण्यासाठी शहर पोलीस दलातील शिपाई ते साह्ययक फौजदार पदावर कार्यरत शेकडो कर्मचाऱ्यांनी बदलण्यासाठी अर्ज केला आहे.या अर्जाची छाननी येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे.या मधूनच प्रशासकीय कारण आणि विनंतीवरून बदल्या होणार आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून दोन्ही उपयुक्त कार्यालय आणि सर्व पोलीस ठाण्याला 24 जुलै पर्यंत राहिलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांची माहिती पाठविण्याची मुदत आहे. पुढील आठवड्यात पोलीस कर्मचारी यांची बदली होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
पसंतीचे ठिकाण मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांची फिल्डिंग..
गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे, या ठिकाणी बदली व्हावी यासाठी सर्वाधिक इच्छुक आहेत.तर अनेक जण पोलीस मुख्यालयातच राहण्यासाठी आग्रही आहेत. आपण अर्जात नमूद केलेली ठिकाण पैकी पसंतीचे ठिकाण मिळावे या साठी अनेक कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे फिल्डिंग लावण्याचा तयारीत आहेत.तर अनेक कर्मचारी हे वरिष्ठ अधिकारी यांचे वाहन चालक, आर.ट.पी.सी., रायटर, व त्यांच्या संपर्कात असलेल्या मध्ये पार्ट्या रंगत आहेत.तर अनेक जण एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत.अशी माहिती सूत्रांनी दिली.









